स्वच्छता सुरभी 75 हजार मुलांनी लिहिले मुख्य कार्यकारी अधिका-यांना
मुंबई, दि. 16, ऑगस्ट - आनंदी ऑगस्ट अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील 75 हजार मुलांनी कार्यकारी अधिकारी यांना स्वच्छता या विषयवार पत्र लिहून आपले अभिप्राय कळविले आहेत. पाणी व स्वच्छता विभागा मार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जिल्हातील मुलांचे स्वच्छता या विषया बाबत असलेले ज्ञान व पत्र लिखाणात त्यांची प्रगती ह्या दोनी होऊन योग्य उपयोजना करण्यास मदत होणार आहे. ह्यात निवडण्यात आलेल्या पत्राला जिल्हा परिषदे मार्फत लवकरच पुरस्कृत करण्यात येईल जेणेकरून ह्या मुलांना प्रोत्साहन मिळण्यात मदत होईल. ह्या पात्रांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, निवासी जिल्हाधिकारी नवनाथ जरे, तसेच जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते पत्राची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या उपक्रमा मागे हागणदारी मुक्त पालघर निर्माण करण्याच्या कार्याला गती मिळवुन जिल्हा लवकरात लवकर हागणदारी मुक्त घोषीत व्हावा हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
