Breaking News

शाळेच्या अभ्यासक्रमांच्या पुस्तिकेत भारताच्या नकाशातून काश्मीर गायब

औरंगाबाद, दि. 16, ऑगस्ट - शहरातील एका खाजगी प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांतील भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरच गायब झाल्याचा  प्रकार उघड झाला आहे. ही चूक  चूक असल्याचा खुलासा शाळेचे संचालक  यांनी केला आहे.
या प्रकरणी काही पालकांनी शाळेकढे आक्षेप नोंदवल्यानंतर हा तकलादू खुलासा करण्यात आला आहे. येथील सिडको एन-3 भागातील टॉडलर्स नर्सरी या शाळेच्या  ज्युनियर केजी या वर्गासाठीच्या ‘होमवर्क वर्कशीट’मध्ये ही गंभीर चूक झाली आहे. काश्मीर वगळलेला हा नकाशा एकाच पानावर नजरचुकीने झाला  तर हा नकाशा  थेट सहा पानांवर  आहे. या सर्व प्रकारामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार तसाच नकाशा येत आल्याने पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे  आक्षेप नोंदवला.
त्यानंतर शाळा प्रशासनाने खुलासा केला की, प्रायव्हेट व्हेंडर्सकडून पुस्तके छापून घेतो. त्यांच्याकडून ही चूक झाली आहे सर्व पुस्तके बदलून दिली जाणार आहेत.