Breaking News

आयपीएलमधील ‘राजस्थान’ संघाचे नाव बदलणार?

नवी दिल्ली, दि. 22, ऑगस्ट - इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स या संघाचे नाव बदलण्याची परवानगी संघाच्या मालकांनी भारतीय  क्रिकेट नियामक मंडळाकडे मागितली आहे. 2015 साली भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे राजस्थान आणि चेन्नई या दोन संघांवर बंदी घालण्यात आली होती.  2018च्या हंगामात या दोन्ही संघांचे पुनरागमन होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नवी सुरूवात करण्याच्या उद्देशाने संघाचे नावही बदलण्याची परवानगी  संघाच्या मालकांनी मंडळाकडे मागितली आहे, असे मंडळाच्या अधिका-याने सांगितले.