Breaking News

गणेशोत्सवात सजिर्कल स्ट्राइकचा देखावा

वंदेमातरम् नवयुवक मंडळाचा अनोखा उपक्रम 

बुलडाणा, दि. 29 - येथील गांधी चौकातील वंदेमातरम् नवयुवक मंडळाच्यावतीने यावर्षी गणेशोत्सवात सजिर्कल स्ट्राइकचा देखावा  सादर करण्यात आला आहे. हा देखावा गणेशोत्सवाचे विशेष  आकर्षण ठरत आहे.
वंदेमातरम् मंडळाच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान आकर्षक  देखावा सादर करण्यात येतो. यामध्ये धार्मिक, सामाजिक व  पौराणिक स्वरूपाचे देखावे सादर केले जातात. यावर्षी मंडळाचे  गणेशोत्सवाचे 34 वे वर्ष असून, यंदा पाकव्याप्त काश्मीरमधील  सजिर्कल स्ट्राइकचा रोमहर्षक देखावा सादर केला आहे. रॉयल  डेकोरेटर्स, अमरावतीद्वारा प्रस्तुत या देखाव्याचे निवेदक किरण  जोशी, अमरावती हे असून, पार्श्‍वभूमीसह संपूर्ण घटनाक्रमाचे  निवेदन यामध्ये सादर केलेले आहे. पाकिस्तानकडून भारतात  पसरविला जात असलेला दहशतवाद, पठाणकोट व उरी येथील  दहशतवादी हल्ले यांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय सैन्यदलाने 29 स प्टेंबर 2016 रोजी पाकव्याप्त काश्मिरात घुसून पाकिस्तानी दहश तवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच 35 ते 40 दहशतवाद्यांचा  मुडदा पाडला. या घटनेचे रोमहर्षक वर्णन निवेदकाने केलेले  असून, सदर देखावा गणेशभक्तांच्या पसंतीस उतरत आहे. एलईडी  स्क्रीनवर पार्श्‍वभूमी स्पष्ट करणारी उत्कृष्ट दृश्ये दाखविण्यात येत  असून, देखाव्यामध्ये हेलिकॉप्टरमधून उतरणारे कमांडो व  त्यांच्याकडून दहशतवाद्यांच्या छावण्यांना लक्ष्य करतानाचे दृश्य  अंगावर रोमांच उभे करणारे ठरत आहे. त्यामुळे हा देखावा  पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.