Breaking News

शेतकरी संघटनेच्या नगर तालुकाध्यक्षपदी संदिप गेरंगे

अहमदनगर, दि. 09 - युगात्मा शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या नगर तालुका अध्यक्षपदी निंबळक येथील दुग्धोत्पादक प्रगतशील शेतकरी संदीप गेरंगे यांची  निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सचिन चोभे यांनी ही निवड जाहीर केली. गेरंगे यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या  राज्य व जिल्हा कार्यकारिणीसह डॉ. बी. एम. शिंदे, महादेव गवळी, संतोष शिंदे, प्रगतशील शेतकरी भाऊराव गायकवाड, पोपटराव गाडगे, संतोष गेरंगे, विजय लांडगे,  गोरख चव्हाण, बापूसाहेब जगताप, विलास लांडगे, शिवाजी मोरे, सुरेशशेठ पठारे  मा. सरपंच संजय गेरंगे पाटील आदींनी अभिनंदन केले. निवडीनंतर गेरंगे म्हणाले  की, माझ्यासारख्या शेतकर्‍याला संघटनेने ही जबाबदारी दिल्याबद्दल मी राज्य व जिल्हा कार्यकारिणीचा आभारी आहे.