Breaking News

नागरिकांना राख्या बांधून चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन

अहमदनगर, दि. 09 - देशसेवेचे कर्तव्य पार पाडून, समाजसेवेसाठी सरसावलेल्या माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने रक्षाबंधन व क्रांती  दिनाच्या पार्श्‍वभुमीवर भारत माताच्या जयघोषात नागरिकांना राख्या बांधून, चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले. तर स्वदेशी वस्तूंचा स्विकार  करण्याची शपथ नागरिकांना देण्यात आली. जनजागृतीसाठी फाऊंडेशनच्या वतीने विविध चायना उत्पादित वस्तू व स्वदेशी वस्तूंची माहिती असलेल्या पत्रकाचे वाटप  करण्यात आले.  सावेडी येथील भिस्तबाग चौकापासून ते श्रीराम चौकापर्यंन्त राबविण्यात आलेल्या या मोहिमेत फाऊंडेशनचे अध्यश शिवाजी पालवे, सचिव जगन्नाथ जावळे,  भाऊसाहेब कर्पे, निवृत्ती भाबड, दिगंबर शेळके, गणेश पालवे, संभाजी वांढेकर, भीमराज आव्हाड, साईनाथ घोरपडे, राहुल पाटील, राजू अनमल, रघुनाथ औटी,  पप्पू आव्हाड, संकेत डोळे, अक्षय पोटे, अमोल आंधळे, अर्जुन कदम, संजय शिवचरण, विशाल पालवे, यादवराव आव्हाड, अ‍ॅड.संदीप जावळे, मच्छिंद्र पालवे,  डॉ.बकुल पालवे आदि उपस्थित होते.
भारताशी युध्दाची भाषा करणार्या चीनला धडा शिकविण्यासाठी त्यांच्या मालावर बहिष्कार टाकण्याची गरज आहे. भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून, चिनी  मालाचा खप भारतात सर्वाधिक आहे. चिनी मालावर पुर्णत: बहिष्कार टाकल्यास चीनची अर्थव्यवस्था कोळमडणार आहे. तर परदेशी वस्तूंपेक्षा स्वदेशी वस्तू खरेदी  केल्यास भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट होणार असल्याची अपेक्षा माजी सैनिकांनी व्यक्त केली.
भारतीय सैनिक सीमेवर चीन सारख्या शत्रूंपासून मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहे. भारतीय नागरिकांनी आपले कर्तव्य म्हणून चीनच्या मालावर बहिष्कार घालून  आपल्या सैनिकांचे मनोबल उंचावण्यास मदत करावी. चीनचे भारतात येणारे वस्तू निकृष्ट दर्जाच्या असून, त्याद्वारे नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका पोहचण्याची  शक्यता आहे.