Breaking News

दूध भुकटी प्रकल्प लवकरच सुरू करणार - जानकर

पुणे, दि. 16, ऑगस्ट - राज्यातील सर्वात मोठे बजेट असलेला वरवंड येथील दूध भुकटी प्रकल्प लवकरच सुरू करणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.  ते दौंड तालुक्यातील डाळींब येथे हनुमान मंदिराच्या कलशारोहन व उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
मंत्री जानकर बोलताना पुढे  की, दुग्धविकास खात्याचे यापूर्वी बजेट 140 कोटी होते.  आता वाढून 750 कोटी झाले आहे. दुधाच्या दरात 7 रुपयांची वाढ केली  आहे. दुधाच्या दरात 70-30 याप्रमाणे धोरण करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले. शेतकर्‍यांना शेती व्यतिरीक्त आदी उद्योगातून हातभार लागावा म्हणून मच्छ  उद्योग आदी वाढवण्यासाठी 21 योजना आणल्या आहे.  चारायुक्त शिवार योजना, मच्छयुक्त तलाव योजना यांसह आदी योजनांचा  असल्याचे जानकर यांनी  सांगितले.
यावेळी आमदार राहुल कुल बोलताना म्हणाले, की पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून खुपटेवाडी फाट्याचे पाणी दौंडच्या पश्‍चिम भागातील जिरायती भागास  पूर्ण दाबाने मिळण्यास तांत्रिक कारणांमुळे अडचणी येत आहे. त्यात तांत्रिक बदल करून या भागास पाणी  देता येईल ? याबाबत प्रयत्न केले जातील. तसेच या  भागात  असणारी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे केली जातील. पुढील काळात पुण्याच्या धरणाचे आपल्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी संघर्ष  होईल. पुणे शहराने वापरून उर्वरीत आपल्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे अन्यथा न्यायालयीन लढाईची तयारी केली असल्याचे राहुल कुल म्हणाले.
यावेळी जिल्हा  सदस्या पूनम दळवी, कीर्ती कांचन, हेमलता बढेकर, रणजितसिंह निंबाळकर, राजेंद्र कांचन,  पंचायत समितीच्या सभापती वैशाली महाडीक,  दौंड तालुका भाजपचे अध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, अशोक होले, डाळींबच्या सरपंच मंगला सुतार, किसन म्हस्के, नंदकुमार म्हस्के, बाळासाहेब म्हस्के यांसह मान्यवर  आणि ग्रामस्थ उपस्थित होते.