Breaking News

विंचूरला दरोडेखोरांचे थैमान

चाकुचा धाक दाखवुन लाखोंचा ऐवज लुटला

विंचूर, दि. 27, ऑगस्ट -येथे उत्साहपुर्ण वातावरण सार्वजनिक तसेच घरोघर श्री गणेशची स्थापना झाली. विंचूरनगरी ऐन साखरझोपेत असताना रिमझिम पाऊस पडत असताना 5 ते 6 दरोडेखोरांनी तीन ठिकाणी चाकूचा धाक दाखवत सोन्या चांदिच्या दागिण्यांसह लाखांचा ऐवज लुटला. या घटनेचे वृत्त समजताच निफाड पोलिस अधिकारी  तसचे लासलगाव पोली स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले. या घटनेत माजी सरपंच तथा ग्रा.प.सदस्या यांचे पती रत्नाकर दरेकर(48) जखमी झाले.दरम्यान दोन संशयितांना तवेरा गाडीसह ताब्यात घेतले आहे.
 येथील मरळगोई रस्त्यालगत वस्ती असणा-या माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपालिका सदस्य सौ. शकुंतला दरेकर यांच्या घरावर दरोडेखोरांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास मागच्या दरवाज्याची कडी, कोंडा तोडून दरोडा टाकला. प्रारंभी दरोडेखोरांनी माजी सरपंचांचे पती रतन नामदेव दरेकर यांना मारहाण करीत चाकूचा धाक दाखवत घरातील सोने व पैशांची मागणी केली. घरातील महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र, डोरले व इतर सोन्याचे दागिणे तसेच द्राक्षबागाच्या मजुरीसाठी ठेवलेले दोन लाख रुपये चोरट्यांनी लुटून नेले. त्यानंतर दरोडेखोरांनी गोविंद शिवराम दरेकर यांच्या वस्तीवर आपला मोर्चा वळवून तेथे चाकुचा धाक दाखवित मोबाईल व पाच हजार रुपये घेऊन चोरटे फरार झाले. येवला रस्त्यालगत असलेल्या श्री स्वामी समर्थ काँलनीतील अरुण संपत ढोमेस यांना शस्त्रांचा धाक दाखवित दोन तोळे सोने व रोख रक्कम लुटून नेली. पोलिस अधिका-यांनी तत्काळ घटना स्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. मध्यरात्री येवला रस्त्यालगत उभे असलेले तवेरा वाहन ताब्यात घेत दोन संशयितांना गजाआड केले आहे.
पंचविस ते तीस वयोगटातील सुमारे सहा ते आठ जणांच्या दरोडेखोरांनी गावात धुमाकुळ घातल्याने गावात दहशत पसरली असून, गावात रात्रीच्या सुमारास गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
** सोनालीचे धाडस - गोविंद दरेकर यांच्या घरातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवुन पैशांची मागणी होत असताना गोविंद दरेकर यांची मुलगी सोनाली हिने धाडस दाखवुन घराबाहेर पळ काढला. बाहेर उभ्या असलेल्या दरोडेखोरांच्या साथीदाराला गुंगारा देत तीने आरडाओरड करुन शेजारील वस्तीकडे धाव घेतली. सोनालीच्या ओरडण्यामुळे घराबाहेर उभ्या असलेल्या साथीदाराने आतील जोडीदारांना इशारा करुन बाहेर बोलावून घेत तेथून पलायण केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सोनालीच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.