Breaking News

गणेशोत्सवात मुस्लिम स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग

जळगाव, दि. 31, ऑगस्ट - येथील डॉ राधेश्याम चौधरी यांच्या संकल्पने नुसार ’जळगाव फर्स्ट’ या राजकारण रहीत बॅनरखाली राष्ट्रिय एकात्मता वृध्दिंगत  करण्याच्या उदात्त हेतूने एक अभिनव संकल्पना मांडली ती अशी - सध्या सुरू असलेल्या गणेशउत्सवात मुस्लिम बांधवांनी आपल्या हिंदू बांधवांच्या प्रेम,स्नेह आणि एकात्मता वाढीच्या दृष्टिकोनातून उत्सव काळात स्वयंसेवक म्हणून सेवा द्यावी.
या संदर्भात जळगाव फर्स्ट’ च्या राष्ट्रीय मुख्यालयात हिंदू मुस्लिम बांधवांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या मध्ये मोठया संख्यने हिंदू मुस्लिम समाजाचे  मान्यवर तसेच तरुणांचा सक्रिय सहभाग होता ज्यात प्रमुख्याने डॉ. राधेश्याम चौधरी,फारूक शेख,सतीश वाणी,साजिद शेख,कफिल शेख,विशाल वाघ,अशपाक  पिंजारी,जुगलकिशोर चौबे,जमील शेख,बाबा देशमुख,सलीम इनामदार,विशाल पवार,दानिश सय्यद,शोएब शेख,प्रसाद,विरु,मराठे यांची उपस्थिती होती.
या दरम्यान सचिन नारळे, अजय गांधी,कोगटा या मान्यवरांशी फोनवर चर्चा करून सल्ला मसलत करण्यात आली.
सदर संकल्पनेला हिंदू मुस्लिम समाजातील मान्यवरांनी तसेच तरुणांनी जोरदार समर्थन दिले. बैठकीनंतर मा.जिल्हाधिकारी महोदयांशी शिष्टमंडळाने भेट घेतली  असता ’राजेंनी’ या उपक्रमाचे कौतुक करत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे.आता या
संदर्भात मा.पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी भेट घेऊन पोलिसांच्या सहकार्याने या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यात येईल.