Breaking News

साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन

नवी दिल्ली, दि. 26, ऑगस्ट - भाजपमधील वादग्रस्त खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलं आहे. साक्षी महाराजांनी सच्चा सौदा  पंथाचे प्रमुख गुरमित राम रहीम सिंह याचं समर्थन केले आहे. त्यामुळे आता साक्षी महाराजांसह भाजपवरही टीका सुरु झाली आहे.
एक व्यक्ती लैंगिक शोषणाचा आरोप करते. मात्र, हा पूर्वग्रहही असू शकतो किंवा हव्यासापोटीही हा आरोप झाला असेल. भारतीय संस्कृतीची प्रतिमा मलीन करण्याचं  हे षड्यंत्र आहे. हे अत्यंत नियोजित पद्धतीने रचलेला कट आहे., असं धक्कादायक वक्तव्य खासदार साक्षी महाराज यांनी केलं असून, त्यांनी जाहीरपणे राम रहीम  यांचं समर्थन केले आहे.