Breaking News

गणपती बप्पा मोरया जयघोषात नगरकरांनी केले गणरायाचे स्वागत

अहमदनगर, दि. 26, ऑगस्ट - गणपती बाप्पा  मोरया ,मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात व ढोलताशाच्या गजरात नगरकरांनी गुरुवारी गणरायाचे उत्सवात स्वागत  केले . घरोघरी , सार्वजनिक गणेश उत्सव  मंडळात श्री ची प्रतिष्ठापना करण्यात आली . मेघराजाने दुपारी हजेरी लावल्याने कार्यकर्त्याचा उत्साह वाढला होता . 
शहरात ठिकठिकाणी गणरायाचे मोट्या जलौषात स्वागत करण्यात आले साने - चोघडे  ढोल ताशाच्या निनादात उत्साहपूर्ण  वातावरणात मांगल्याचे प्रतीक  असलेल्या श्रीगणेशाची विधिवत  पूजा करण्यात आली गणेश मंडळांनी मिरवणूक काढून गणरायाची स्थापना केली . माळीवाडा परिसर  चितळे रोड, गांधी मैदान ,  सवडी पाइपलाइन रोड , तसेच भिगार व केडगाव आदीभागात  गणेशमूर्ती  सजावटीचे दुकाने उभारण्यात आली होती . जयघोषामुळे नगर मंगलमय झाले होते  ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात ऑईलीस अधीक्षक शर्मा याच्या सपत्नीक श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून महाआरती करण्यात आली यावेळी देवस्थानचे सर्व  पदाधिकारी हजर होते . अचानक आलेल्या पावसाने साहित्य विक्रेत्याची पळापळ झाली.