Breaking News

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात पोलीस क्वॉर्टरवर दहशतवादी हल्ला

तीन जवान शहिद

श्रीनगर, दि. 26, ऑगस्ट - जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्याच्या उद्देशानं आज पहाटे 4.30 वाजता दहशतवादी घुसले. पुलवामाच्या पोलीस  लाईनमध्ये हे दहशतवादी घुसले असून त्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहे. थेट पोलिसांच्या क्वॉर्टरलाच लक्ष्य केल्यानं हा मोठा दहशतवादी हल्ला  मानला जात आहे. हा हल्ला चार दहशतवाद्यांनी केला असून एकाला कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे.
पुलवामामध्ये पोलीस क्वॉर्टरला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक पोलीस आणि दोन सीआरपीएफ जवान शहीद तर  सातजण जखमी झाले आहेत. दहशतवादी सध्या या रहिवाशी इमारतींपैकी एका इमारतीमध्ये लपले असून त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची प्राथमिक माहिती  आहे. अजूनही तीन दहशतवादी या इमारतींमध्ये लपले आहेत.
दरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस क्वॉर्टर रिकामी करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. या परिसरात जवळपास 10 इमारती आहेत, त्यापैकी दोन ब्लॉक  खाली करण्यात आले आहेत. या क्वार्टरमध्ये राहणार्‍या सर्व 32 कुटुंबांना वाचवण्यात यश आलं आहे. या परिसरातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली  आहे.