Breaking News

मराठा मोर्चेकर्‍यांमुळे दक्षिण मुंबई गजबजून गेली

मुंबई, दि. 09 - उच्चभ्रू , व्यापारी मंडळींच्या दक्षिण मुंबईमध्ये बुधवारी सकाळपासूनच मराठा मोर्चेकर्‍यांच्या गर्दीची लगबग जाणवू लागली होती. चर्चगेट, नरिमन पॉईंट  , हुतात्मा चौक , फोर्ट या भागात राज्याच्या विविध भागातून आलेले मोर्चेकरी गटागटाने हिंडत असताना दिसून येत होते. मराठा क्रांती मोर्चाचे काळया रंगाचे टी शर्ट  , भगव्या टोप्या अशा वेशातील मोर्चेकरी चाकरमानी मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होते. नरिमन पॉईंट , मरीन ड्राईव्ह या अत्यंत उच्चभ्रूंच्या भागातही मोर्चेकरी आकर्षणाचा  केंद्रबिंदू ठरले होते. चर्चगेट स्थानकावर स्थानकावर सकाळपासूनच मोर्चेकरी प्रचंड संख्येने दाखल होत होते. मोर्चेकरी कोणताही गडबड , गोंधळ न करता आझाद  मैदानाच्या दिशेने जात होते.