Breaking News

लिलाव रोखण्यासाठी सुब्रतो रॉय यांचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

नवी दिल्ली, दि. 09 - म्बीव्हॅलीचा लिलाव रोखण्यासाठी सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. म्बीव्हॅलीची  लिलाव प्रक्रिया तुर्तास थांबवली जावी, अशी मागणी त्यांनी या अर्जातून केली आहे. न्यायालयाचा आदेश पाळून वेळेत पैसे परत करण्यासाठी मी अन्य प्रकल्पावर  काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या अर्जावर गुरूवार अथवा शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
25 जुलै रोजी न्यायालयाने रॉय यांना 7 सप्टेंबरपर्यंत 1805 कोटी जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी न्यायालयाने म्बीव्हॅलीचा लिलावाच्या प्रक्रियेला सुरूवात  करण्याचे आदेश दिले होते. आधी पैसे जमा करा त्यानंतर गुंतवणूकदारांना तुमच्या सांगण्यानुसार पैसे मिळाले होते की नाही हे पाहिले जाईल, असे न्यायालयाने  सांगितले होते. ज्यांना पैसे दिले ते खरोखरीच गुंतवणूकदारच होते का याचाही तपास केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.