Breaking News

बेकायदा मोबाईल टॉवरवर कारवाई करण्याचे महापौरांचे आदेश

अहमदनगर, दि. 09 - नगर शहरात गेल काही काळात मोबाईल टॉवरची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.महापालिका प्रशासनाने शहरातील मोबाईल टॉवर चे  सर्व्हेक्षण करण्याचे काम एका खासगी संस्थेकडे सोपविले असून विना परवानगीने उभारण्यात आलेल्या टॉवर्सच्या विरूध्द कारवाई करण्याचा आदेश महापौर सुरेखा  कदम यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अहमदनगर शहरात केवळ 153 मोबाईल टॉवर्स असल्याची नोंद महापालिकेच्या रेकॉर्ड मध्ये आहे.महापालिकेने टॉवर्सची संख्या व सर्व्हेक्षण करण्याचे काम जयभवानी  टेलिकॉम सर्व्हिसेस एजन्सी या खासगी कंपनीला सोपविले आहे.सदरच्या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार शहराच्या निम्म्या भागातच तब्बल 215 मोबाईल टॉवर्स  असल्याचे दिसून आले आहे.वास्तविक पाहाता शहराच्या हद्दीत मोबाईल टॉवरची उभारणी करण्यापूर्वी मनपाच्या नगर रचना कार्यालयाकडून रितसर परवानगी घेणे  आवश्यक आहे.शहरातील मोबाईल टॉवर बाबत आढावा घेण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी महापालिकेत एका बैठकीचे आयोजन केले होते.स्थायी समिती  सभापती सुवर्णा जाधव,महिला बाल कल्याण समिती सभापती सारिका भुतकर, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे,उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांच्यासहीत अधिकारी  उपस्थित होते.महापालिकेने 2008 साली एक ठराव करून मनपाच्या परवानगी शिवाय उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर्सला दंडात्मक कारवाई म्हणून दीड लाख  रूपयांची आकारणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.मात्र आता या ठरावाला देखील तब्बल 9 वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला असल्याने विना परवाना मोबाईल टॉवर्स  च्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.बैठकीमध्ये जयभवानी टेलिकॉम सर्व्हिसेस एजन्सी या कंपनीच्या प्रतिनिधीला पुढील तीन  दिवसात शहराच्या उर्वरित भागातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला असून बेकायदेशीरपणे उभारलेल्या मोबाईल टॉवर्स  च्या विरोधात कारवाई करण्याचा आदेश महापौर सुरेखा कदम यांनी प्रशासनाला दिला आहे.