कल्याणमधील दहीहंडी उत्सवात डीजे बंद, सुरक्षा नियमांचे पालन
कल्याण, दि. 16, ऑगस्ट - कल्याणमध्ये आज दहीहंडीचा उत्साह नेहमी इतकाच असला डीजेचा आवाज मात्र पूर्णपणे बंद होता. न्यायालयाने घालून दिलेली आवाजाची बंधने व डीजे असोसिएशनचा कामबंदचा पवित्रा यामुळे कल्याणमधील सहजानंद चौकातील भारतीय जनता पक्ष शहर शाखेची दहीहंडी व शिवाजी चौक येथील शिवसेना शहर शाखेची दहीहंडी या दोन्ही महत्त्वपूर्ण डीजेविना फुटल्या. शिवाय, सर्व दहीहंडी आयोजक व पथकांनी वयाचे, सुरक्षेचे नियम पाळल्याचे आले.
याबाबत शिवसेना कल्याण शहर शाखेचे नगरसेवक प्रभुनाथ भोईर यांनी सांगितले की, आम्ही न्यायालयाचा मान राखत यंदा डीजे बोलवला नसून न्यायालयाच्या अन्य नियामंचेही काटेकोरपणे पालन केले. शिवाय सहाव्या थरापासून वरील सर्व थरांवरील गोविंदाना सुरक्षा किट लावणे केले. दोराच्या सहाय्यानेही आम्ही त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या हंडीत सांस्कृतीक सादरीकरण न करता जमा झालेले पैसे नाशिक जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्ही यावर्षी डीजेचा समावेश केला नसून थराला प्राधान्य दिले नसल्याचे भारतीय जनता पक्षाच्या कल्याण महिला मोर्चाच्या वरिष्ठ नेत्या नीरजा सांगितले. रात्री 9.45 मिनिटांपर्यंत सर्व गोविंदा पथके केवळ सलामी देतील. त्यानंतर शेवटी मानाच्या गोविंदा थरांनुसार आम्ही हंडीची उंची आवश्यकता भासल्यास कमी करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. सुरक्षेच्या नियमावलीचे व 14 वर्षांखालील गोविंदावरील बंदीच्या नियमाचेही काटेकोरपणे पालन केल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही सलामी देण्यापूर्वी गोविंदांच्या वयांबाबतची माहिती घेत आहोत. त्यामुळे वर्षांखालील गोविंदा आढऴल्यास सलामीस नकार दिला जाईल. शिवाय आम्ही रुग्णवाहिका व संरक्षण किट सारख्या आवश्यक पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील तीन महत्त्वाच्या पदांवर पक्षाच्या आदरणीय व्यक्ती विराजमान असल्याने यंदाचा स्वतंत्र्य दिन, गोपाळकाला आमच्यासाठी विशेष आहे. यंदा आमच्या महिला मोर्चाच्या महिलांचेही गोविंदा पथक सुरू करण्यात आले असून आम्हीही सलामी असल्याने अधिक आनंदी असल्याचे भाजपच्या जिल्हा महामंत्री प्रिया शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, दहीहंडी समन्वय समितीनेही सर्व पालन करण्याचे आवाहन केले असून पोलीस दलानेही नियमांचे पालन होईल याची काळजी घेतली.