स्वच्छ महाराष्ट्र अभियानात अमळनेर जिल्हा प्रथम
जळगाव, दि. 16, ऑगस्ट - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान(नागरी)च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ अभियानांतर्गत झालेल्या एक सदस्यीय समितीच्या पहाणीत अमळनेरला जिल्ह्यात पहिला क्रमांक दिला आहे.यासाठी येत्या काळात अमळनेर पालिकेला भरघोस असा शासनाच्या विविध योजनांचाही लाभ होणार आहे.
या वेळी पालिकेच्या इमारतीत सर्वांचे सत्कार करण्यासाठी एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पाटील, शहर विकास आधाडीचे प्रणेते अनिल भाईदास पाटील, प्रा श्याम पाटील,उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे,रामभाऊ संदानशिव,विरोधी पक्ष नेते प्रवीण पाठक,सर्व सभापती,नगरसेवक,कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात या स्वच्छता अभियानासाठी अहोरात्र मेहनत घेणारे विभागाचे प्रमुख, मुकादम, सर्व कर्मचार्यांचे, स्वच्छता ठेवण्यासाठी गेल्या काही महिन्यांन पासून मेहनत घेणारे पुण्यातील आकाश कल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष ठाकूर, घनकचरा व्यवस्थापन संदर्भात नाशिक येथील मॅको इकोनॉमीकल इनव्हायरोमेंट सोल्युशन प्रा लि कंपनीचे अमळनेर व्यवस्थापक खलील शहा,उघड्यावर शौचालयास बसू नका या बाबत एका ध्वनिचित्रफिती द्वारे शहरात जनजागृती करणारे महेंद्र पाटील यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रसंगी अनिल पाटील,साहेबराव पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त करत नागरिकांनी दैनंदिन ठेवलेली स्वच्छता यावर पालिकेच्या कर्मचार्यांनीही आपल्या परिसरात ठेवलेल्या व्यवस्था आणि उघड्यावर शौचालयास बसू नये म्हणून पालिकेच्या माध्यमातून ठीकठिकाणी बनविण्यात आलेले चांगले शौचालय यामुळेच या अभियानात आपणही लाभार्थी ठरलो आहे असे मत व्यक्त केले.तर यात शहर स्वच्छ ठेवल्याने शासन स्तरावर प्रोत्साहन अनुदान 1:50 कोटी पैकी 30% रक्कम म्हणजे 45 लाख पालिकेला पुढील काळात स्वच्छ ठेवण्यासाठी प्राप्त झाली असून सर्व नागरिकांनी ही स्थिती कायम ठेवण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुटे यांनी केले.
तर या आनंदात सर्व नागरिकांनी सहकार्य केल्याने हे शक्य झाल्याचे मत व्यक्त करीत शहरात स्वच्छता कायम ठेवावी असे मत नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी केले.यावेळी पाणीपुरवठा सभापती राजेश पाटील,नगरसेवक संतोष पाटील,सुरेश सैनिक राजेंद्र यादव,निशांत अग्रवाल उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचलन बांधकाम सभापती मनोज पाटील यांनी तर आभार प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी मानले.