शंभर रुपयांत मुंबई-कोकण प्रवासाची आमदार नीतेश राणे यांची योजना
रत्नागिरी, दि. 16- ऑगस्ट - ‘स्वाभिमान’कडून येत्या 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी खास बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या प्रवासासाठी फक्त शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या हाऊसफुल झाल्या असून देवगड, मालवण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले आदी तालुक्यांमधील कोकणी जनतेला खासगी बसगाड्यांच्या एका तिकिटासाठी 800 ते 1200 रुपये मोजावे आहेत. त्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे खासगी बसची सेवा पुरवण्याचा निर्णय आमदार श्री. राणे यांनी आहे. या गाड्या मुंबईतून वेगवेगळ्या ठिकाणांहून सोडण्यात येणार आहेत. त्याकरिता 17 ते 19 ऑगस्टपर्यंत वांद्रे येथील स्वाभिमानच्या मुख्य कार्यालयात (1 डेक्कन, मुव्ही टाइम, सबर्बिया सिनेमाजवळ, एस. व्ही. रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई 400050) तिकीट आणि विक्री होणार आहे. केवळ 100 रुपयांमध्ये हे तिकीट उपलब्ध करून दिली जाणार आहे. नोंदणी निश्चित केलेल्या दिवशी मुंबईतील विविध ठिकाणांहून या गाड्या सोडल्या जाणार आहेत. कोकणी माणसांची मागणी वाढल्यास त्यांच्यासाठी जादा गाड्याही सोडल्या जाणार आहेत. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल, असे आमदार राणे यांनी
या तिकीट विक्रीतून मिळालेली रक्कम कोकणातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी तसेच कोकणातील विधायक कामांसाठी जाणार आहे.
या तिकीट विक्रीतून मिळालेली रक्कम कोकणातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी तसेच कोकणातील विधायक कामांसाठी जाणार आहे.
