Breaking News

गुरमीत निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबमधील इंटरनेट बंद

चंदीगढ, दि, 25, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंगप्रकरणी न्यायालयाकडून निकाल येण्याआधीच पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये   मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 
संपूर्ण राज्यात 72 तासांपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. तसेच पंजाब आणि हरियाणामध्ये एक संयुक्त नियंत्रण कक्ष सुरू करण्यात  आल्याची माहिती हरियाणातील गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राम निवास यांनी दिली. उद्या होणार्‍या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर चंदीगडहून येणा-या ट्रेन रद्द  करण्यात आल्या आहेत. तसेच बस सेवाही स्थगित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.