पाकिस्तानातील टी20 मालिकेसाठी डू प्लेसिसकडे ’शेष विश्व’चे नेतृत्व
इस्लामाबाद, दि, 25, ऑगस्ट - पाकिस्तानमध्ये सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानविरूद्ध होणा-या टी20 मालिकेसाठी शेष विश्व संघाचे नेतृत्व द. आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीस याच्याकडे सोपवण्यात आले आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने 12 आणि 13 सप्टेंबरला तर तिसरा सामना 15 सप्टेंबरला गद्दाफी स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजाम सेठी यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन या वृत्ताला दुजोरा दिला. या मालिकेमुळे पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना पुन्हा चांगले दिवस येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मालिकेसाठी शेष विश्व संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा मान मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया डू प्लेसीस याने व्यक्त केली.
शेष विश्व संघ : फाफ डू प्लेसीस, हशीम अमला, डेव्हिड मीलर, मॉर्ने मोर्कल, इम्रान ताहीर, सम्युअल बद्री, डॅरेन सॅमी, जॉर्ज बेली, बेन कटींग, टीम पेन, ग्रँट एलियट, थिसारा परेरा, पॉल कॉलिंगवूड, तमीम इक्बाल
शेष विश्व संघ : फाफ डू प्लेसीस, हशीम अमला, डेव्हिड मीलर, मॉर्ने मोर्कल, इम्रान ताहीर, सम्युअल बद्री, डॅरेन सॅमी, जॉर्ज बेली, बेन कटींग, टीम पेन, ग्रँट एलियट, थिसारा परेरा, पॉल कॉलिंगवूड, तमीम इक्बाल