Breaking News

विसर्जित मूर्तींच्या मातीपासून इकोफ्रेंडली बाप्पा

वर्धा, दि, 25, ऑगस्ट - पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं आवाहन आता सर्व स्तरातून होत असताना, वर्ध्यातील वैद्यकीय जनजागृती मंचानं एक नवा उपक्रम राबवला.  यामध्ये त्यांनी विसर्जित मूर्तींच्या मातीपासूनच बाप्पाच्या मूर्ती पुन्हा तयार केल्या आहेत. यामुळे मूर्तीची विटंबना थांबून, पर्यावरण बचावचा उद्देशही साध्य होत  असल्याचं मंचाच्या वतीनं सांगण्यात येत आहे.
केमिकल इंजिनिअर असलेले नीरज शिंगोटे हे 20 वर्षांपासून जॉब करुन अशा पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्याचा छंद जोपासत आहेत. तर गजानन भांगे हे मूर्तिकार  आहेत, त्यांचा व्यवसायच बाप्पासह देवाच्या मूर्ती साकारणं पण व्यवसाय करतानाही पर्यावरणाचा विचाराला त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं आहे.