Breaking News

वस्तू व सेवा करप्रणाली कुटुंबातल्या नव्या नवरी समान - अर्जुन राम मेघवाल

नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - वस्तू व सेवा करप्रणालीबाबत व्यापारी वर्गात अजूनही संभ्रम कायम आहे. ही प्रणाली म्हणजे कुटुंबातल्या नव्या नवरी प्रमाणे आहे. त्यामुळे नव्या नवरी प्रमाणे तिलाही रुळण्यास वेळ लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केले. नेवाडा प्रादेशिक आर्थिक विकास केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
रियल इस्टेट उद्योगाला या करप्रणालीमुळे अडथळ्यांना सामोरे जावे लागत असल्यास सरकारची मदत मागण्याचे आवाहनही त्यांनी केले. सरकारने ही प्रणाली देशाच्या विकासासाठी आणली आहे. आपण कुटुंबाच्या भल्यासाठी काही निर्णय घेत असतो, तसेच ही कर प्रणालीही देशाच्या विकासासाठी स्विकारण्यात आली आहे. यामुळे देशाचा योग्य व आवश्यक मार्गाने विकास होणार आहे, असेही ते म्हणाले.