Breaking News

चिंचोडी पाटील येथील जि.प.ची शाळा मोडकळीस

अहमदनगर,दि
.30  : निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेची दुर्घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यातील इतर शाळांची अवस्था जाणून घेण्यासाठी ग्रामस्थ शाळांमध्ये भेटी देत आहे. निंबोडीप्रमाणे चिंचोडी पाटील येथील शाळेची अवस्था जीर्ण झाली असून, स्लॅबवर पावसांचे पाणी साचलेले आहे. या स्लॅबमधून पावसाचे थेंब वर्गात पडत आहे. चिंचोडी येथील शाळेकडे लक्ष दिल्यास निंबोडी सारखी घटना घडू शकते, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला. या शाळेचे बांधकाम फार जुने नसले, तरी नित्कृष्ट कामाअभांवी आणि सातत्याने सुरू असलेल्या पावसांमुळे शाळेची अवस्था जीर्ण झाली आहे. प्रशासनाने या शाळेकडे लक्ष देऊन त्वरित खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. चिंचोडी पाटील येथील जीर्ण झालेल्या खोल्यांचे बांधकाम नव्याने उच्च दर्जाचे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जर प्रशासनाने याकडे लक्ष घातले नाही, तर शाळेला कुलूप ठोकणार असल्याचे गा्रमस्थांनी सांगितले. चिचोंडी पाटील शाळेच्या इमारतीपासून भविष्यात निंबोडी सारखा धोका घडल्यास त्याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असा इशारा ओबीसी सेवा संघाने दिला आहे.