Breaking News

महावितरणचे पाच कामचुकार अधिकारी निलंबित

औरंगाबाद, दि. 09 - महावितरणच्या पाच अधिका-यांनी कामात कुचराई केली. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केल्यामुळे ऑगस्टमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक  ओमप्रकाश बकोरिया यांनी अधिका-यांचे निलंबन केले. बीडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्‍वनाथ भारती, औरंगाबाद सहायक अभियंतारूपाली पोहरकर, उदगीरचे  सहायक अभियंता सिद्धार्थ पाटील, कन्नडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आशिष शिरोळे, मीटर टेस्ट कर्मचारी गौतम पगारे अशी त्यांची नावे आहेत. थकीत वीज  बिल वसुली, वीज चोरी थांबवणे, गळती रोखण्याचे महावितरणसमोर मोठे आवाहन आहे. यातच काही अधिकारी कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत.  ते नोकरीच्या ठिकाणी राहत नाहीत. यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. महावितरणला मोठा फटका बसत आहे. हे प्रकार थांबवणे, कामकाजात पारदर्शकता  आणण्यासाठी बकोरिया यांनी कठोर पाऊल उचलले असून पाच अधिका-यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच आणखी काही कामचुकार कर्मचा-यांवर कारवाई  होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.