Breaking News

औरंगाबादच्या गणेशोत्सवावर पर्यावरणाची छाप, शाडू मातीचे गणपती बसविण्यावर भर

औरंगाबाद, दि. 27, ऑगस्ट - औरंगाबादचे खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ग्रामदैवत संस्थान गणपतीची आरती करून औरंगाबादच्या गणेशोत्सवास दणक्यात  सुरूवात झाली. यावेळी विधानसभाअध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, प्रदीप जैस्वाल, महापौर बापू घडामोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी  औरंगाबादच्या गणेशोत्सवावर पर्यावरणप्रेमीं प्रचाराची बरीच छाप पडल्याचे दिसून आले. पर्यावरणवाद्यांच्या प्रचारामुळे यंदा पॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा शाडू  मातीच गणपती बनवून घरोघरी बसविण्यावर भर दिला आहे. यामुळे गणेशमूर्तींच्या विक्रीत तब्बल 25 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. एकूण 22000  घरांमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बसविल्या गेल्याची महिती संकलित झाली आहे. विविध ठिकाणी गणेशाचे स्वागत करताना महिलांची ढोल ताशापथके हा  आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे.सावरकर चौक येथील महासंघाच्या मुख्य कार्यालयातील जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने गणेशोत्सव  सोहळ्याचा आरंभ श्री गणेशमुर्तीच्या स्थापनेने आज खा. खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. गणेश महासंघ उत्सव समितीच्या गणरायाची खा. खैरे यांच्या हस्ते  स्थापना लोकसहभागातून विविध उपक्रम राबविणा-या औरंगाबाद जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने गणेशोत्सव काळात विविध उपक्रमांचे, स्पर्धा तसेच जनजागृती  कार्यक्रमांचे 5 सप्टेंबर पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या गणेश उत्सव सोहळ्याचा प्रारंभ खा. खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती  म्हणून औरंगाबाद श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार, महापौर भगवान घडामोडे, आ. अतुल सावे, महानगर प्रमुख प्रदिप जैस्वाल, श्री गणेश  महासंघाचे अध्यक्ष राजू शिंदे, माजी अध्यक्ष अभिजित देशमुख, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, मनपा कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे, कार्याध्यक्ष  नंदकुमार घोडेले, गोकुळ मलके, संदीप शेळके, अनिकेत पवार, विशाल दाभाडे, रतन घोंगते, रोहन पारगावकर, भगवान देशमुख, आदींची उपस्तिती  होती.विघ्नहर्त्यागणेशाची मूर्ती नेण्यासाठी आलेली विविध गणेश मंडळांची ढोल-ताशा पथके आणि त्यांचे तालबद्ध वादन हे शुक्रवारचे खास आकर्षण ठरले. शहरभर  या पथकांचाच बोलबाला होता.