Breaking News

रेल्वेला निष्काळजीपणाचे किती हवेत बळी?

दि. 21, ऑगस्ट - भारतीय रेल्वेची जगात दुसर्‍या क्रमांची रेल्वे म्हणून ओळख असली, तरी प्रवाशी सेवा, गतिमानता आणि सुरक्षितता यांचा विचार करता  ही रेल्वे जगात मागासलेली आहे, असं म्हणण्यास वाव आहे. जगात रेल्वेचे अपघात होत नाहीत, असं नाही; परंतु त्यांचं प्रमाण आणि भारतातील अपघातांचं  प्रमाण यात कमालीची तफावत आहे. उत्तर प्रदेशात शनिवारी अपघात झाल्यानंतर सहज त्या राज्यातील मोठ्या अपघातांच्या सं़ख्येवर नजर टाकली, तर  आपली निष्क्रियता लक्षात येते. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेत बाँबसदृश्य वस्तू आढळल्या.
काश्मीरकडं जाणार्‍या रेल्वेत मृत बाँब आढळला. त्यामुळं मुजफ्फरनगर झालेला अपघात हा ही घातपात असण्याची शंका व्यक्त होत होती; परंतु हाती  आलेल्या माहितीनुसार हा घातपात नव्हता, तर तो निव्वळ अपघात होता. बुलेट ट्रेनची भाषा आपण करतो; परंतु रेल्वेची सध्याची स्थिती सुधारण्याकडं  लक्ष देत नाही. अपघाताचं प्रमाण श्ाून्यावर आणणं ही कदाचित कवी कल्पना वाटेल; परंतु ते ध्येय ठेवून अपघातांचं प्रमाण कमी करण्यावर भर द्यायला  हवा. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नव्या तंत्राचा वापर करून अपघाताची पूर्वसूचना मिळेल, असं जाहीर केलं असलं, तरी प्रत्यक्षात तसा अनुभव येत नाही.  उत्तर पˆदेशात शनिवारी संध्याकाळी आणखी एक रेल्वे अपघात झाला. पुरीहून हरिद्वारला जात असलेल्या उत्कल एक्स्पˆेसचे 14 डबे मुजफ्फरनगरमध्ये  रुळावरून घसरले. संध्याकाळी 5.46 वाजता खतौली स्टेशनजवळ झालेल्या या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. 60 पेक्षा जास्त जखमींपैकी 40  जणांची पˆकृती गंभीर आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  जखमींच्या उपचारांसाठी मुजफ्फरनगरच्या रुग्णालयांतील  आपत्कालीन वॉर्ड रिकामे करण्यात आले आहेत. उलटलेल्या रेल्वे डब्यांत अडकलेल्या लोकांना काढण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
या घटनेमागं अतिरेकी हल्ल्याचा कट असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. घटनास्थळी रुळाचे काही तुकडे सापडले आहेत. उत्तर प्रदेश  एटीएसचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दुर्घटनेच्या वेळी रेल्वे ताशी 105 किलोमीटर वेगानं धावत होती. मीरत कँटनंतर पुढचा थांबा  मुजफ्फरनगर होता. मात्र, त्याच्या 25 किलोमीटर  आधीच  खतौलीत रेल्वे रुळावरून घसरली. खतौली स्टेशन पार करून जगत कॉलनीपर्यंत  पोहोचताच तिसरा डबा रुळावरून घसरला. त्यानंतर 13 डबेही घसरत गेले. पाच डब्यांचा चेंदामेंदा झाला. दोन डबे एकमेकांवर चढले. कॉलनीतील  काही घरांनाही डब्यांनी धडक दिली. एका कॉलेजच्या इमारतीत एक डबा घुसला. हे सर्व वर्णन वाचल्यानंतर मनात एक प्रश्‍न निर्माण झाला, की रेल्वेचे डबे  रुळावरून घसरले, इथपर्यंत ठीक; परंतु लोकांच्या घरात, महाविद्यालयात डबे घुसतात, याचा अर्थ रेल्वे रुळानजीक  ही बांधकामं होती, असा होतो. इतक्या  जवळ बांधकाम होती, ती नियमात आहेत, की अतिक्र मित? अतिक्रमित बांधकामं असतील, तर ती होईपर्यंत रेल्वे काय करीत होती? रेल्वेनं सांगूनही ती  बांधकामं काढली गेली नाहीत का? लोहमार्गाच्या कडेला झालेल्या झोपड्या, बांधकामं पाहिली, तर मुजफ्फरनगर घटनेचा धडा घ्यायला हवा. यापुढं अशा  दुर्घटना घडून त्यात लोहमार्गानजीकच्या लोकांचा बऴी जाऊ शकतो.
रेल्वे रुळाचं काम सुरू  असूनही रेल्वे त्याच मार्गावरुन पुढं नेण्याचा पˆयत्न करण्यात आला. यामुळं पुरी-हरिद्नार एक्स्पˆेस रुळावरुन घसरली. या  दुर्घटनेला रेल्वेचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचं बर्‍याच पुराव्यातून सिद्ध  झालं आहे. घटनास्थळी हातोडा आढळून आला. तो रेल्वे  कर्मचार्‍यांचाच असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय तांत्रिक काम करतानाचं रेल्वेचं साहित्यही ट्रॅॅकशेजारीच पडून होतं. अपघात झाला त्या ठिकाणी रेल्वे  इंजिन चालकानं इमर्जन्सी बˆेक लावल्याचंही आढळून आलं. ज्या रेल्वे रुळावर ही घटना घडली, तिथं ट्रॅकचा तुकडा कापलेल्या अवस्थेत आढळून  आला. सोबतच दोन रुळांना जोडणारी फिश प्लेटही मिळाली. रेल्वे रुळावर दुरुस्तीचं काम सुरू असल्याचं त्यातून सिद्ध होतं. घटनास्थळापासून काही  अंतरावर लाल झेंडा आढळून आला. दुरुस्तीचं काम सुरू असलं, तर हा लाल झेंडा वापरला जातो. रेल्वे रुळाचं काम चालू असताना ही गाडी तिथून  गेली, असं पˆत्यक्षदर्शींनी सांगितलं. विशेष म्हणजे अपघातावेळी घटनास्थळी रेल्वेचे काही कमर्चारी असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. रेल्वे रुळावर  दुरुस्तीचं काम चालू होतं आणि रेल्वे कर्मचार्‍यांनी निष्काळजीपणा दाखवला, अशी माहिती उत्तर पˆदेशचे मुख्य गृह सचिव अरविंद कुमार यांनी दिली. हे  सर्व पाहिलं, तर रेल्वे अपघाताला इंजिन चालक, सिगक्ल यंत्रणा ऑपरेट करणारे असे सारेच जबाबदार आहेत, असं दिसतं.
काय केल्यावर रेल्वे अपघात थांबतील, हा आजच्या घडीचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. दररोज किमान 11 पˆवासी रेल्वे अपघातात आपला जीव गमावत  आहेत. तर तितकेच जखमीदेखील होत आहेत. मृत्यू आणि रेल्वे असं जणूकाही समीकरणच बनलं आहे. त्यामुळं रोज मरे त्याला कोण रडे असं म्हणत  कोणी रोजच्या रेल्वे अपघाताकडे गांभीर्यानं बघायला तयार नाही. एखाद्या युद्धात किंवा दहशतवादी हल्ल्यात जेवढे बळी जात नाहीत तेवढे जीव रेल्वे  अपघातात जात आहेत. गेल्या काही दिवसांत रेल्वे अपघाताची एक शृंखलाच सुरू झालेली आहे. त्यामध्ये दिसून येणारे एक साम्य म्हणजे पˆत्येक जागी  रुळ उखडलेले असल्यानं भरधाव वेगानं पळणार्‍या रेल्वेगाडीला अपघात झालेला आहे. पˆचंड वेगानं धावणार्‍या त्या गाडीचे डबे रुळावरून घसरतात आणि  मग एकमेकांवर चढून भीषण अपघात होतात. हे अपघात अकस्मात सुरू झालेले असू शकत नाहीत. रेल्वेच्या रुळांचे जाळे देशाच्या कानाकोपर्‍यात   पोहोचलेले असून, त्या पˆत्येक ़फुटावर किंवा जागी अखंड पाळत ठेवणं अशक्य आहे. मात्र,  अशा रेल्वेच्या रुळांची अखंड देखभाल चालू असते. गॅन्गमन  नावाचा कर्मचारी गटागटानं रुळांच्या बाजूनं वाटचाल करून त्यांची अहोरात्र  देखभाल करीत असतो. अशा गॅन्गमनच्या टोळ्या विखुरलेल्या असतात आणि  जिथं रुळांमध्ये सैलपाणा आलेला असतो किंवा किरकोळ नादुरुस्ती असते; त्याची डागडुजी तिथल्या तिथे केली जात असते. जिथं गाड्यांची संख्या मोठी  व सातत्यानं जे रुळ वापरले जातात; तिथं अधिक देखभाल केली जाते. तिथं पहाराही सातत्यानं दिला जात असतो; पण ज्या लोहमार्गावरून कमीतकमी  गाडया धावतात, तिथं अखंड पहारा नसतो, की देखभालही नित्यनेमानं करावी लागत नाही. आठ-दहा गाडयाच जो लोहमार्ग वापरतात, तिथले रुळ  काहीसे दुर्लक्षित रहातात.  अपघात अशाच जागी घडलेले आहेत. बहुतांश लोहमार्ग खेडयापाडयातून जाणारे असतात आणि त्यांच्या सभोवती गावं, वस्त्या  वसलेल्या आहेत. अशा निर्जन भागातील लोहमार्गावर कोणाचा पहारा नसतो; पण तिथूनही वेगानं गाड्या धावत असतात., त्यापैकी दोनचार फुटाचा रुळ  जरी उखडलेला असेल, तर गाडीला भीषण अपघात होऊ शकतो. कारण इंजिन पुढं असतं आणि मागं नुसते डबे जोडलेले असतात. गाड्यांना आपली  एक गतिमानता पˆाप्त झालेली असते. साहजिकच त्यापैकी एका डब्याला जरी बˆेक लागला तरी मागचा व पुढले डबे आधीच्याच वेगानं त्याला धक्का देत  असतात. 20-25 डब्यांच्या गाडीचा एक डबा रुळावरून घसरला, तरी मागचे डबे आपल्या गतिमानतेमुळे पुढल्या डब्याला ढकलून पुढं जाण्याचा पˆयत्न  करतात. त्यातून मग डबे एकमेकांवर चढण्याचा व भीषण अपघाताचा पˆसंग ओढवत असतो. गेल्या काही रेल्वे अपघातांचं निरीक्षण केल्यास त्यामध्ये  अशाच अपघातांचं पˆमाण आढळून येईल.