Breaking News

औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!

औरंगाबाद, दि. 21, ऑगस्ट - मराठवाड्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे  कडेठाणहून पैठणकडे जाणारी एसटी बस नाल्यात अडकली. सकाळी 10 च्या सुमारास कडेठाण गावातून पैठणकडे जाणारी बस नाल्यात अडकली.  गावकर्‍यांनी वेळीच मदतीसाठी धाव घेतल्यामुळं बसमधल्या 7 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्यामुळे बस  अजूनही नाल्यातच अडकलेली आहे.