मिरवणूक मार्गाची महापौरांकडून पाहणी
कोल्हापूर, दि. 23, ऑगस्ट - गणेशोत्सव 2017 च्या पार्श्वभुमीवर आज महापौर सौ.हसिना फरास यांनी पदाधिकारी व अधिकार्यांसमवेत गणेश मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पाहणी केली.
यामध्ये मुख्य मिरवणूक मार्ग व मिरवणूक मार्गात सामील होणार्या पर्यायी रस्ते व त्याठिकाणी महापालिकेकडून लावण्यात येणारे बॅरेकटेस् व पुरविण्यात येणार्या सेवांची माहिती घेतली. तसेच दसरा चौक ते बिंदू चौक रस्त्याची पाहणी केली. यावेळी नवीन बांधलेले चेंबर रस्त्यावर खाली वर झालेले तसेच बिंदू चौक येथे रस्त्यावर खड्डे निदर्शनास आलेने तात्काळ दुरुस्त करणेच्या सुचना उपशहर अभियंता एस.के.माने यांना दिल्या. मिरजकर तिकटी येथील पाहणी दरम्यान विद्युत तारा लोंबकळत असलेचे निदर्शनास आले असता, महापौरांनी सहाय्यक अभियंता (विद्युत) अमित दळवी यांना तात्काळ एमईसीबीसी संपर्क करुन धोकादायक तारांचा बदोबस्त करणेच्या सुचना केल्या. टेंबेरोड व मुख्य मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरणार्या झाडयांच्या फादया छाटणेबाबत सहाय्यक उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे यांना सुचना केल्या. महाद्वार रोडवर अंत्यत धोकादायक असलेल्या दोन ते तीन इमारती निर्दशनास आलेने उपहशहर अभियंता आर.के.जाधव यांना सदरच्या धोकादायक इमारती तात्काळ निष्काशीत करणेच्या सुचना दिल्या. याबरोबर उमा टॉकीज, खासबाग मैदान, बिंनखाबी गणेश मंदीर, गंगावेश, पंचगंगा घाट या रस्त्यांची पाहणी केली. तसेच संबधीत अधिकार्यांकडून गणेशोत्सवामध्ये महापालिकेकडून पुरविण्यात येणार्या सेवा सुविधांची माहिती महापौरांनी घेतली.
गणेश उत्सव हा पर्यावरण पूरक व्हावा म्हणून कोल्हापूर महानगरपालिका प्रयत्नशील आहे. मा. उच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महानगरपालिकेतर्फे पंचगंगा घाट, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव, कळंबा तलाव व अन्य ठिकाणी गणेश विसर्जन कुंड, निर्माल्य कलश व काहीली इ. व्यवस्था करणेत येत आहे, या व्यवस्थेचा गणेश मूर्तीचे विसर्जन व मूर्ती व निर्माल्य दान करणेसाठी उपयोग करणेचे महानगरपालिकेतर्फे आवाहन आहे.
शहरातील शासकीय कार्यालये, सामाजीक संस्था, पर्यावरणवादी संस्था, महाविद्यालये, पर्यावरण प्रेमी नागरीक, विद्यार्थी इत्यादींचे मार्फत पर्यावरण विषयक उपक्रम राबविणेत येत आहेत. मूर्ती दान व एक भाग एक गणपती असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. शाडूची मूर्ती, नैसर्गीक रंगाचा आग्रह धरावा. तीव्र लाईट, थर्मोकोल, उंच मूर्ती, बंदीस्त देखावे व अडथळा होईल असे मंडप टाळावेत. आवाजाचे प्रदूषण होऊ नये म्हणून डॉल्बीचा वापर टाळण्यात यावा. आटोपशीर व शातंतामय मिरवणूक इत्यादीसह हा सण पर्यावरण पूरक साजरा करणेचे आवाहन महापौर सौ.हसिना फरास यांनी केले आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार, परिवहन समिती सभापती नियाज खान, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.वनिता देठे, माजी नगरसेवक आदिल फरास, उपशहर अभियंता एस.के.माने, रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, आर.के.जाधव, सहा.उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे, सहा. अभियंता (विद्युत) अमित दळवी व कर्मचारी उपस्थित होते.