स्वच्छ विदयालय पुरस्कारासाठी देशभरातून 172 शाळांची निवड; महाराष्ट्रातील 15 शाळांचा समावेश
नवी मुंबई, दि. 23, ऑगस्ट - केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशातून स्वच्छ भारत - स्वच्छ विदयालय या उपक्रमांतर्गत स्वच्छ विदयालय पुरस्कार सन 2016-17 साठी देशभरातून 172 शाळांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 15 शाळांचा समावेश आहे. सदरचा पुरस्कार हा जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर देण्यांत येतो. ठाणे जिल्हयातून या पुरस्कारासाठी राजर्षी ठत्रपती शाहू महाराज विद्यालय, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 104, आंबेडकर नगर या एकमेव शाळेची निवड करण्यात आलेली असून या पुरस्कारामुळे नवी मुंबई शिरपेचात आणखी एक राष्ट्रीय मानाचा तुरा खोवला गेलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेस नुकताच स्वच्छ भारत अभियानातंर्गत देशात आठवे आणि महाराष्ट्र राज्यासह देशाच्या पश्चिम विभागात सर्वप्रथम क्रमांकाचा स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झालेला असताना आंबेडकरनगर, राबाडे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा माध्यमिक शाळेची निवड राष्ट्र्रीय स्तरावरील ‘स्वच्छ विदयालय पुरस्कार’ सन 2016-17 करिता होणे ही नवी मुंबई शहरासाठी अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे मत या शाळेच्या जडणघडणीपासून आगामी विकासाकडे विशेष लक्ष देणारे नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केले आहे. या पुरस्काराबद्दल महापौर, आयुक्त यांचेसह महापालिका पदाधिकारी, नगरसेवक - नगरसेविका, अधिकारीवर्ग यांनी संबंधितांचे अभिनंदन केले आहे.
हा पुरस्कार दिनांक 01 सप्टेंबर, 2017 रोजी, सकाळी 10.00 वाजता, केंद्रीय मानव संसाधन व विकास मंत्री ना. श्री. प्रकाश जावडेकर यांचे शुभहस्ते दिल्ली येथे एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येत आहे. या पुरस्कार सोहळयास शाळेच्या वतीने शिक्षक श्री.मारुती गवळी व विदयार्थी सुरज झा हे उपस्थित राहणार आहेत. ‘स्वच्छ विदयालय पुरस्कार’ प्राप्त शाळांना पन्नास हजार रूपये इतके अतिरिक्त शाळा अनुदान मिळणार असून त्याचा विनियोग शाळेची स्वच्छता व मुलांच्या आरोग्य वृध्दीसाठी करण्यात येणार आहे.