Breaking News

अधिकृत वीजजोडणी घेण्याचे गणेशोत्सव मंडळांना आवाहन

रत्नागिरी, दि. 23, ऑगस्ट - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेऊन सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महावितरण  कोकण परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता प्रभाकर पेठकर यांनी केले आहे.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. सामाजिक व लोकशिक्षण करणारे देखावे उभारले जातात. धार्मिक कार्यक्रमासाठी  महावितरणकडून चार रुपये 31 पैसे प्रतियुनिट इतक्या माफक दरात वीजपुरवठा केला जातो. इतर कोणत्याही वर्गवारीपेक्षा हा दर कमी आहे. त्यामुळे सर्व  मंडळांनी गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपाची अधिकृत वीज जोडणी स्वतंत्रपणे घेणे अपेक्षित आहे. महावितरणचे मोबाइल प, संकेतस्थळ, मध्यवर्ती ग्राहक  सुविधा केंद्र अथवा नजीकच्या शाखा कार्यालयातून तात्पुरत्या नवीन वीज जोडणीकरिता अर्ज दाखल करावेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास  तातडीने कोटेशन देण्याचे व कोटेशन भरल्यावर त्वरित वीजजोडणी देण्याचे निर्देश प्रभारी मुख्य अभियंता प्रभाकर पेठकर यांनी सर्व कार्यालयांना दिले  आहेत.
अधिक माहितीसाठी तसेच विजेसंबंधीच्या तक्रारीसाठी महावितरणच्या 1912, 18002333435 आणि 18002003435 या टोल फ्री क्रमांकावर किंवा  नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.