Breaking News

मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये बाप्पा

नाशिक, दि, 25, ऑगस्ट - मनमाडमध्ये परंपरेनुसार यंदाही गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. गेल्या वीस वर्षापासून मनमाडहून  सुटणार्‍या मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये श्रीगणेशाची वाजत गाजत स्थापना करण्यात येते. मनमाड रेल्वे स्थानकात सकाळपासूनच फलाट क्रमांक 4 वर  रोजच्या प्रमाणे गोदावरी एक्सप्रेस आली,मात्र आज या गाडीच्या पासधारकांच्या बोगीत काही वेगळेच वातावरण पहायला मिळाले. निमित्त होते ते या गाडीत होणा-या  श्री गणेशाच्या स्थापनेचे. मनमाड ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई असा प्रवास करणारे सर्वधर्मीय चाकरमानी या गाडीत गणपतीची स्थापना मोठ्या उत्सहात  करतात. यंदाही रात्री पासधारक आर्कषक सजावट करण्यात येऊन सकाळी गाडी सुटण्यापूर्वी श्रींची मान्यवरांच्या हस्ते विधवत पुजा आरती करण्यात आली. विशेष  म्हणजे दरवर्षी वेगवळे सामाजिक संदेशाचे पोस्टर येथे लावून समाजप्रबोधनाचं काम या माध्यमातून केले जाते. गाडीची वेळ होताच गाडी मार्गस्थ होते आणि गणपती  बाप्पांचा दररोज मनमाड ते कुर्ला असा प्रवास सुरु होतो. प्रत्येक स्टेशनवर चढणारा प्रवासी गणपती बाप्पाचे दर्शन घेतो आणि आमचा प्रवास सुखरुप होऊ दे,  प्रवासात कुठलेही विघ्न येऊ देऊ नको अशी प्रार्थना करीत प्रवास करतो.