Breaking News

राम रहीम समर्थकांचा हा न्यायाचा मार्ग नव्हे

दि. 26, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना 15 वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. खरंतर न्यायलयानं त्यांना  अजून शिक्षा सुनावली नव्हती. दोषी धरलं होतं, तर त्याविरोधात अपील दाखल करून  बाबा राम रहीम यांना निर्दोष ठरविण्याचा मार्ग मोकळा होता; परंतु तेवढा  विवेक अशा भक्तमंडळीकडं नसतो. वकिलांची फौज उभी करून बाबा राम रहीम खरंच निर्दोष असतील, तर त्यांच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं; परंतु देशात  राज्यघटना, कायदा यापेक्षा काही व्यक्ती स्वत:ला मोठं समजायला लागल्या आहेत.
कायद्यासमोर सर्व समान असतात, हे अशा मोठ्या लोकांनीच आपल्या कृतीतून दाखवून द्यायला हवं असतं. गुरूवारपासून जेव्हा न्यायालय निकाल देईल, असं जाहीर  झालं, तेव्हापासून बाबा रहीम यांच्या समर्थकांनी पंजाब, हरियाणात विविध ठिकाणी जमायला सुरुवात केली होती. त्याचवेळी काहीतरी विपरीत घडणार अशी शंकेची  पाल मनात चुकचुकत होती. खरंतर या दोन्ही सरकारांनी तेव्हापासून जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करायला हवी होती. जमावाची मानसिकता विचारात  घेऊन उपाययोजना करायला हव्या होत्या. बाबा राम रहीम यांनाही न्यायालयातून आपल्या समर्थकांना शांत राहा, असं सांगता आलं असतं; परंतु आसाराम बापू  असोत, की बाबा रहीम; त्यांनी समर्थकांना शांततेचं आवाहन करण्याऐवजी समर्थकांकडून साक्षीदारांवर हल्ले होण्याचे प्रकार होत असताना मूग गिळून गप्प राहणं  पसंत केलं. डेरा समर्थक मंडळी तर गुरूवार संध्याकाळपासून माध्यमांना आमच्याविरोधात काही दाखवू नका, प्रसारित करू नका, अन्यथा परिणामांना सामोरं जा,  असं धमकावीत होते. प्रत्यक्षात दोषारोप निश्‍चित झाल्यानंतर माध्यमांना लक्ष्य करण्यात आले. पंजाब, हरियाणामध्ये राम रहीम समर्थंकानी केलेल्या आंदोलनाला  हिंसक वळण लागले आहे. आतापयत 25 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर दीडशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. बाबा गुरमीत राम रहीम यांना  पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांच्या समथर्कांनी प्रसारमाध्यमांच्या ओबी व्हॅन्स फोडल्या. सुरक्षापथकांनी परिस्थिती नियंणात  आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडयाही फोडल्या. पंजाबमध्ये मुक्तसर, भटिंडा आणि मानसा येथे संचार बंदी लागू करण्यात आली आहे. पंचकुलामध्ये जमावानं  सुरक्षापथकांवरच हल्ला  केला. जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना तिथं हवेत गोळीबारही करावा लागला. जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे  पोलिसांना मागं हटावं लागलं. अनेक गाडयांची जाळपोळ करण्यात आल्याचं वृत्त आहे. पंजाबमध्ये दोन रेल्वे स्थानकं जाळून टाकली आहेत. बाबा गुरमीत राम रहीम  यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या करणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात  येणार आहे. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर निमलष्करी दलाच्या 53 तुकडया आणि हरयाणा पोलिस दलाचे 50 हजार जवान तैनात करण्यात आले होते. पंजाब,  हरयाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये 72 तासांठी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. न्यायालयात आज राम रहीम यांच्याविरोधातील खटल्याचा  निकाल सुनावला जाणार असल्यानं हरयाणा आणि पंजाबमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पंचकुला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं  बंद आहेत. पंजाब व हरयाणाच्या दिशेनं येणार्‍या सर्व रेल्वेगाडया रद्द केल्या आहेत. सिरसाजवळच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
गुरुमीत राम रहीम यांच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या पˆयत्नाचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या चारशे पुरुष अनुयायांची जबरदस्तीनं नसबंदी केल्याचा  आरोप त्यांच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसं केलं होतं, असं सांगण्यात येतं. डेरा सच्चा सौदा पंथाच्या  बेकायदा कामाविषयी वृत्तपात लिखाण करणार्‍या पत्रकाराची हत्या त्यांच्याच सांगण्यावरून झाली होती, असा आरोप आहे. शीख समाजाचे गुरू गोविंद सिंह  यांच्यासारखी वेशभूषा राम रहीम यांनी केल्यानं त्या समाजानं संताप व्यक्त केला होता. राम रहीम यांच्या आश्रमात शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण दिलं जात असल्याच्या  तक्रारीनंतर हरयाणा उच्च न्यायालयानं त्याची नियमित तपासणी करावी, असे आदेश दिले होते. 23 सप्टेंबर 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील  अनुयायांचा सत्संग बोलावला आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला उत्तराधिकारी घोषीत केलं. त्याच राम रहीम यांना आज न्यायालयानं साध्वीवरील  बलात्कारप्रकरणी दोषी धरलं आहे. न्यायालयानं निर्णय देताना हे गंभीर पˆकरण असून रहीम यांना दोषी ठरवण्यात येत असल्याचं सांगितलं. निर्णय ऐकून राम  रहीम यांच्या डोळ्यात पाणी आलं. जवळपास सात ते 10 मिनिट ते स्तब्ध होते.  या पˆकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात  आहे. निकालानंतर बाबा राम रहीम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अंबाला येथील तुरूंगात त्यांची रवानगी झाली. त्यामुळं त्यांच्या भक्त परिवारानं कायदा  हातात घेतला. डेराच्या समथर्कांनी कायदा हातात घेण्याचा पˆयत्न केल्यास गरजेनुसार शस्बळाचा वापर करा. अजिबात डगमगू नका. तसंच कुठल्याही राजकीय  नेत्यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करा, असं न्यायालयानं बजावलं होतं. त्यामुळं न्यायालयातही राम रहीम यांचे भक्त  कायदा हातात घेण्याची शक्यता वाटत होती. पंजाब व हरयाणा ही दोन्ही राज्य सरकारं मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली.