Breaking News

मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रसह अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम

मुंबई, दि. 21, ऑगस्ट - हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाज आजही महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर वरुणराजची कृपा कायम राहणार आहे. त्यात  मराठवड्यातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम  राहण्याची शक्यताय. आज सकाळी सहापर्यंत मुंबईशहरात 94.36 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 100 मिलीमीटर, पश्‍चिम उपनगरात 110 मिलीमीटर  पावसाची नोदं करण्यात आली आहे.
दरम्यान 11.49 मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. भरतीच्यावेळी 4.68 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर असाच कायम  राहिल्यास भरतीच्या काळा मुंबईतल्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.