बिहार जलप्रलयाचे 253 बळी
बिहार, दि. 21, ऑगस्ट - बिहारच्या सीमावर्ती भागात आणि नेपाळमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका बिहारच्या किनारी भागातील जनतेला बसला आहे. अतिवृष्टीमूळे बिहार राज्यातील 51 नागरिक दगावल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आतापर्यंत बळी गेलेल्यांच्या आकडेवारीत वाढ होत ती 253 पर्यंत गेली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पूराचा वेढा पडलेल्या गावांमधून तब्बल 4.64 लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. 2 लष्करी हेलिकॉप्टर्स, एनडीआरएफच्या 20 कंपन्या आणि पीएसीच्या (पूरविषयक) 29 कंपन्यांचे जवान यांच्यासह लष्कर जवानांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.