Breaking News

कोरेगाव : स्वाईन फ्ल्यू-ग्रस्त येवले कुटुंबातील दोघांना लागण

कोरेगाव, दि. 29, ऑगस्ट - स्वाईन फ्ल्यूने बळी घेतलेल्या शिवनाथ एकनाथ येवले याच्या कुटुंबातील दोन सदस्यांना होत असलेल्या ताप व खोकल्याच्या  पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाकडून औैषधोपचार सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, आंबेडकर नगर परिसरात दहशत कायम असून, आरोग्य विभागाने सर्वेक्षण व  आरोग्य शिक्षणाकडे जास्त भर दिला आहे.
आंबेडकर नगरातील पिरणी चालक शिवनाथ येवले यांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यु झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर परिसरात भीती वातावरण असून, सर्वत्र दहशत कायम आहे.  आरोग्य विभागाने सुरुवातीला दुर्लक्ष केले, सोमवारी मात्र तडवळे संमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने या परिसरात पुन्हा एकदा सर्वेक्षण केले. त्यांनी  येवले यांच्या मातोश्री व मुलावर घरीच उपचार सुरु केले आहेत, त्यांना दहा दिवसांच्या गोळ्या देण्यात आल्या असून, त्यांच्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्यात येत आहे.