Breaking News

लवकरच बँकांमध्येही पाच दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता !

नवी दिल्ली, दि. 08, ऑगस्ट -  लवकरच बँकेच्या कर्मचार्यांनाही प्रत्येक शनिवार- रविवार सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.  बँक कर्मचार्यांनाही पाच दिवसांचा  आठवडा करण्याचा प्रस्ताव बनवण्यात आला असून त्यावर विचार करण्यात येत आहे.
इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये बँक कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसाचा आठवडा व्हावा याकरिता प्राथमिक चर्चा झाली आहे. या  महिन्यात या दोन्ही संघटनांमध्ये दुसर्‍या टप्प्यातील चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या प्रत्येक बँक कर्मचारी साधारणपणे साडे सहा तास काम  करत आहे.