Breaking News

छत्तीसगडमध्ये सात नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

रायपूर, दि. 26, ऑगस्ट - छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी सात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यातील एका नक्षलवाद्यावर एक लाखाचे बक्षिस  जाहीर करण्यात आले होते. 
नारायणपुरचे पोलीस अधिक्षक संतोष सिंग यांनी सांगितले की इंडो तिबेटीयन सीमा पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांसमोर येथील पोलीस चौकीत त्यांनी  आत्मसमर्पण केले. राज्याच्या धोरणानुसार आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन केले जाईल, पोलिसांनी सांगितले.