Breaking News

हरियाणातील स्थिती नियंत्रणात, 500 जण ताब्यात

नवी दिल्ली, दि. 26, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय असलेल्या सिरसामधील स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. काल  रात्रीपासून स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. काल रात्रीपासून हिंसाचाराच्या घटना घडल्या नसून शनिवारी सकाळपासून हरयाणा,  पंजाबमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी ‘डेरा सच्चा सौदा’च्या सुमारे 500 समर्थकांना ताब्यात घेतले आहे. 
वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्रीपासून हिंसाचाराच्या घटनांचे वृत्त नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराकडून
सशस्त्र संचलन काढण्यात आले होते . दोन महिला अनुयायींवर बलात्कार केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी गुरमित राम रहिम  यांना दोषी ठरवले. सोमवारी गुरमित राम रहिम यांना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून स्थानिकांना  घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.