Breaking News

हुतात्मा राजगुरू यांची 109 वी जयंती जन्मगावी उत्साहात साजरी

पुणे, दि. 26, ऑगस्ट - देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची 109 वी जयंती जिल्ह्यातील  राजगुरूनगर येथील जन्मस्थळी साजरी झाली. यावेळी देशभरातून अनेक देशभक्त याठिकाणी दाखल झाले होते.
सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, कार्तिकी गायकवाड आणि राजगुरूंचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत राजगुरूंच्या अर्धपुतळ्याला पुष्प अर्पण करून देशभक्तीपर  गीत गाऊन नागरिकांना प्रेरीत करण्यात आले. गुरुवारी सकाळी 10:05 वाजता राजगुरू वाड्यावर ध्वजारोहणही करण्यात आले. गुरुवारी दिवसभर राजगुरुवाडा येथे  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जन्मस्थळ असलेला संपुर्ण वाडा फुलांनी सजविण्यात आला होता. संपुर्ण परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात  आला. देशभरातील राजगुरू प्रेमींनी यानिमित्त राजगुरूंना अभिवादन केले.