Breaking News

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल

नवी दिल्ली, दि. 26, ऑगस्ट - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला. जैन  यांच्यावर 2015 मध्ये 4.63 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये मंगलायतनप्रकल्प, पारस इन्फोसोल्युशन आणि अकिंचंद  डेव्हलपर्स या प्रकल्पांचा समावेश आहे.
दरम्यान जैन यांना आयकर विभागाकडून बेहिशेबी मालमत्ता कायद्यांतर्गत आदेश जारी करण्यात आला होता. यापूर्वी एप्रिल महिन्यात तपास यंत्रणेने याप्रकरणी  प्राथमिक तपास करण्यास सांगितले होते. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे.