Breaking News

गणेश महासंघात फूट नको, एकत्र या - बागडे

औरंगाबाद, दि. 27, ऑगस्ट - ‘नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघात फूट प गारखेडा परिसरात दोन महासंघ तयार झाले आहेत. त्यामुळे महासंघाच्या  पदाधिका-यांनी पुढाकार घेत पुढील वर्षी एकत्र यावे आणि एकच महासंघ ठेवावा,’ अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह आमदार अतुल सावे  यांनी शुक्रवारी व्यक्त केली. गजाजन महाराज मंदिर परिसरात यंदा दोन मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. त्यातील एक आहे ते नवीन औरंगाबाद श्री गणेश  महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील यांचे मंडळ, तर त्यांच्या शेजारी नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघाने गणपती बसवला आहे. पंजाब  वडजेपाटील हे या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गेल्या 12 वर्षांपासून महासंघाचे एकत्र काम पाहणारे वडजे, डिडोरे व त्यांचे सहकारी दोन महासंघात विभागले  गेले आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे शुक्रवारी याठिकाणी आरतीसाठी आले असता ही बाब त्यांच्या लक्षात आली. दोन्हीकडील  आरती झाल्यानंतर बोलताना आमदार सावे यांनी ‘पुढील वर्षी दोन्ही महासंघ एकत्र यावेत. त्यासाठी बागडे यांनी यासाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन केले. तर  विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी ‘जुना, नवा असा वाद नको. एक गाव एक गणपती ही संकल्पना सर्वत्र राबविली गेली पाहिजे. महासंघाने अधिकाधिक सार्वजनिक  हिताचे कार्यक्रम करावे,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. महापौर भगवान घडमोडे, आमदार सुभाष झांबड, डॉ. भागवत कराड, अभिजित देशमुख आदी उपस्थित होते.