Breaking News

बनावट बियाणे देऊन 37 लाख 50 हजाराची फसवणूक

पुणे, दि. 27, ऑगस्ट - व्यापार्‍यास बनावट बियाणे देऊन 37 लाख 50 हजाराची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरुध्द सिंहगड रोड  पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सुशिल पाटोळे (48, रा.नर्‍हेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार रिया बजाज व इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा बियाणे खरेदी  विक्रीचा व्यवसाय आहे. यातील आरोपींनी त्यांना मोबाईलवर कॉल करुन, व्हॉटसअप तसेच ई-मेलव्दारे संपर्क साधून ऍबरोन सिडस जातीच्या 100 बॅगा खरेदी  करण्यास भाग पाडले. मात्र फिर्यादी यांना बॅगेमध्ये बनावट बियाणे देऊन त्यांची 37 लाख 50 हजाराची फसवणूक करण्यात आली. ही घटना मार्च ते मे  महिन्यादरम्यान घडली होती. फिर्यादी यांनी यासंदर्भात तक्रार अर्ज दिला होता. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक खोडदे यांनी सांगितले, हा प्रकार नायजेरीयन फ्रॉडचा आहे. फिर्यादीला आमिष दाखवून बियाणे खरेदीची रक्कम ऑन  लाईन भरायला सांगण्यात आले होते. यानंतर विविध कारणांनी त्यांच्याकडून पैसे काढून घेण्यात आले आहेत.