Breaking News

पाच महाविद्यालयांना आदर्श परिक्षा केंद्राचा पुरस्कार

औरंगाबाद, दि. 27, ऑगस्ट - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदतर्फे पाच महाविद्यालयांना आदर्श परीक्षा केंद्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.  विद्यापीठ वर्धापनदिनी कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. नाटयगृहात हा कार्यक्रम झाला. यावर्षी मत्स्योदरी महाविद्यालय  (अंबड), देवगिरी महाविद्यालय (औरंगाबाद), के.एस.के.महाविद्यालय (बीड) तसेच उस्मानाबाद जिल्हयातून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय व के.टी.पाटील फार्मसी  महाविद्यालय यांना आदर्श परीक्षा केंद्र म्हणून सन्मानित करण्यात आले. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भागवत कटारे, डॉ.शिवाजी थोरे, डॉ.आबासाहेब हांगे,  डॉ.एन.एस.बिराजदार, डॉ.शिवानंद पाटील यांनी सन्मापत्र प्रदान करण्यात आले. कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ.राजेश रगडे, विशेष  कार्यकारी अधिकारी डॉ.वाल्मिक सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात 54 व़िद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. वर्धापन दिनी परीक्षा व  मुल्यमापण मंडळाचे संचालक डॉ.राजेश रगडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर डॉ.रगडे यांनी निकाल, अन्य प्रक्रिया वेळेत पार  पाडण्यासाठी प्रयत्न केले.