डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरला!
अकोला, दि. 03, ऑगस्ट - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरल्याचं आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विद्यापीठ मानांकनातून समोर आले आहे. या मानांकनात अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 48 व्या क्रमांकावर घसरलं आहे. या घसरगुंडीमुळे विद्यापीठ आणि संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. अमेरिकन नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून नुकतेच या विदापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांना पदमुक्त करण्यात आलं. राज्याच्या राज्यपालांनी ही कारवाई केली होती. डॉ. दाणी यांच्याच कार्यकाळात विद्यापीठ अनेक आघाड्यांवर मागे राहिल्याचं चित्र गेल्या पाच वर्षांच्या काळात पहायला मिळालं आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिस्वीकृती समितीने राज्यातील कृषी विद्यापीठांचा आढावा यावर्षीच्या सुरूवातीलाच घेतला होता. आयसीएआरच्या अधिस्वीकृती समितीने सात ते आठ वर्षांनंतर आढावा घेतला आहे. आढाव्यात कृषी विद्यापीठांचे शिक्षण, संशोधन व विस्तार काम समाधानकारक दिसले नाही. म्हणूनच आयसीआरने या कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती रद्द केली होती. त्याचे चांगलेच पडसाद उमटले होते. ही अधिस्विकृती हटवून कृषी विद्यापीठांना संशोधनासाठीचा निधी मिळावा, यासाठीचे प्रयत्न शासनाकरवी करण्यात आले.
2014 पर्यंत राज्यात खासगी कृषी महाविद्यालयांची संख्या भरमसाठी वाढली. पण कृषी विद्यापीठांचे संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक इत्यादी अनेक पदं रिक्त होती. शासनाने रिक्त पदेच न भरल्याने शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्यांचा ताण हा अपुर्या मणुष्यबळावर पडला. कृषी विद्यापीठाचे शासकीय महाविद्यालय तसेच खासगी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, उत्तर पत्रिका तपासणी आदी अतिरिक्त कामे करावी लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळली, संशोधनावरही परिणाम झाला. आयसीएआरच्या अधिस्वीकृती समितीला हे सर्व ठळकपणे दिसले. त्याचाच परिणाम समोर आला असून, राज्यातील कृषी विद्यापीठांचा दर्जा घसरला आहे. परिणामी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रचंड मागे पडले आहे.