Breaking News

बीडमध्ये गणपती वर्गणीतून शौचालयांची उभारणी

बीड, दि, 25, ऑगस्ट - सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की वर्गणी आलीच. गणेशमंडळानी जमा केलेल्या याच वर्गणीतून रोषणाई, सजावट आणि मिरवणुकीवर  लाखोंचा खर्च केला जातो. पण या वर्गणीतून बीड जिल्ह्यातल्या टोकवाडी गावच्या गणेश मंडळाने खास उपक्रम राबवला आहे. हा उपक्रम म्हणजे गावात सार्वजनिक  शौचालयं उभारुन गाव हागणदारीमुक्त करायचा. बीड जिल्ह्यातील टोकवाडी गावात 16 वर्षांपासून एक गाव, एक गणपती हा उपक्रम राबवला जातो. तेव्हापासून गावात  दरवर्षी जमा झालेल्या वर्गणीतून सामाजिक उपक्रम राबवायची परंपरा आहे. त्याच धर्तीवर यंदा गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी टोकवाडी गावात चार सार्वजनिक  शौचालयं बांधण्यात आली आहेत.
डॉ. राजाराम मुंडे यांनी 16 वर्षापूर्वी गावातील लोकांना एकत्र करुन वरद गणेश मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून या गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम  राबवला जातो. प्रत्यक वर्षी वर्गणीतून जमा होणार्या पैशांमधून गणेश मंडळाचे सदस्य आणि गावकरी मिळून विविध उपक्रम राबवतात. यावर्षी गणेश मंडळाने गावात  तब्बल दीड लाख रुपय खर्च करुन चार सार्वजनिक शौचालयं बांधली आहेत.