Breaking News

स्वयंभू स्वामी ओम यांना दहा लाखांचा दंड

नवी दिल्ली, दि, 25, ऑगस्ट - सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी असणारे स्वयंभू बाबा स्वामी ओम यांना, सुप्रीम कोर्टाने दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. देशाचे नवे  सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीला स्वामी ओम यांनी विरोध केला आहे. ही नियुक्ती बेकायदा असल्याचा दावा स्वामी ओम यांनी कोर्टात केला होता.
मात्र कोर्टाने स्वामी ओम यांची याचिका तातडीने फेटाळून लावलीच, शिवाय सवंग लोकप्रियतेसाठी केलेल्या या याचिकेबद्दल, 10 लाखांचा दंड ठोठावला. काही  दिवसांपूर्वीच स्वामी ओम यांना सायकल चोरीप्रकरणाच्या जुन्या खटल्यात अटकही झाली होती. दरम्यान, स्वामी ओम यांनी आपल्याकडे एकही रुपया नाही, त्यामुळे  मी दंड भरु शकत नाही, असं म्हटलं. त्यावर, तुमच्याकडे 34 कोटी अनुयायी असल्याचा दावा करता, मग त्यांच्याकडून एक-एक रुपये जरी घेतला, तरी दंड भरु  शकाल, असं कोर्टाने सुनावलं.