Breaking News

शाहूपुरीत गुटखा जप्त, आरोपी अटकेत

सातारा, दि. 01, ऑगस्ट - शाहूपुरीत पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत येथील रेणुका सोसायटीतील शकील रशीद बागवान यांच्या पत्र्याच्या शेडमधील  31 हजार 992 रु. चा गुटख्याचा माल जप्त केला.ही कारवाई करण्यात आली. याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पो.नि. किशोर धुमाळ यांनी दिली. 
गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि अन्न औषध प्रशासन सातारा यांनी संयुक्तरित्य शकील रशीद बागवान यांच्या घरा नजिकच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला. तेव्हा 32  हजाराच्या गुटख्याच्या पुड्या मिळून आल्या. बागवान यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.