पुण्यातील गिर्यारोहकाचा कारगील भागात दुर्दैवी मृत्यू
पुणे, दि. 01, ऑगस्ट - पुण्यातील प्रसिद्ध आर्किटेक्ट सुभाष टकले (वय 49, धायरी) यांचे कारगील भागातील ‘माउंट नून’ मोहिमेदरम्यान ‘कॅम्प 3’ येथे अतिउंचीवर होणार्या त्रासामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. दिल्लीतील ‘अल्पाईन वांडरर्स’ या गिर्यारोहण संस्थेकडून पुण्यातील सुभाष टकले, जितेंद्र गवारे, दिल्लीतील नितीन पांडे व जम्मू काश्मीर येथील गुलजार अहमद हे ‘माउंट नून’ या 7 हजार 135 मीटर उंच असणार्या शिखरावर मोहिमेसाठी जुलै महिन्यात गेले होते. शुक्रवारी (28 जुलै) ‘माउंट नून’च्या शिखरमाथ्याच्या शेवटच्या चढाईच्या वेळी अतिउंचीमुळे दम लागून शरीरातील त्राण गेल्यामुळे सुभाष टकले यांचा मृत्यू झाला.
सुभाष टकले यांनी 28 जुलै रोजी यांनी आपल्या साथीदारांसोबत ‘माउंट नून’च्या शिखर चढाईसाठी सुरुवात केली. ते जवळपास 7 हजार मीटर उंचीवर पोहोचले असताना सुभाष टकले यांना अतिउंचीमुळे खूप थकवा आला होता व त्यांना पुढे चढाई करणे अवघड जात होते. त्यावेळी टकले यांना तेथेच थांबवून इतर गिर्यारोहकांनी शिखराकडे आगेकूच केली होती. शिखराहून परत येईपर्यंत टकले यांची प्रकृती आणखी खालावली. त्यावेळी सर्वांनी टकले यांना लवकरात लवकर कॅम्प 3 वर पोहचवून पुढे हेलीकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्याचे ठरवले. त्यानुसार उर्वरीत गिर्यारोहकांनी टकले यांना कॅम्प 3 ला आणले व त्यांच्या जवळ अन्न व पाण्याची सोय करून जितेंद्र गवारे ताबडतोब मदतीसाठी ‘बेस कॅम्प’कडे परतला.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ‘बेस कॅम्प’ला पोहोचताच ‘गिरिप्रेमी’ संस्था, भारतीय सैन्य आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने मदत करून भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. कारगिल व लेह येथील भारतीय सैन्य दलाच्या अधिकार्यांनी तातडीने या ऑपरेशनमध्ये सहकार्य केले. दुर्दैवाने हेलीकॉप्टर रेस्क्यू टीम ‘कॅम्प 3’ वर पोहचेपर्यंत सुभाष टकले यांचा मृत्यू झाला होता.