Breaking News

शिवकुमार यांनी आयकर विभागाच्या मुख्यालयात हजेरी लावली

नवी दिल्ली, दि. 08, ऑगस्ट - कर्नाटकचे उर्जामंत्री डी.के. शिवकुमार आयकर विभागाच्या मुख्यालयात आज हजर झाले. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ डी.के.  सुरेशही उपस्थित होते. 
शिवकुमार यांच्या घर व रिसॉर्टसहित 64 ठिकाणांवर बेनामी संपत्ती बाळगल्याप्रकरणी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या  ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर उत्तर देण्यासाठी शिवकुमार यांना आयकर विभागाकडून समन्स बजवण्यात आले होते. आपल्या कडील  संपत्ती कायदेशीररित्या कमवल्याचे स्पष्टीकरण छापेसत्रानंतर त्यांनी दिले होते. आयकर विभागाच्या समन्सवरही त्यांनी दोन दिवसांनी उत्तर दिले.