Breaking News

धुवांधार पावसामुळे परभणी जिल्हयातील गावांचा संपर्क तुटला

परभणी, दि.30 : जालना आणि परभणी जिल्ह्यात कालपासून ा धुवावसामुळे जिल्हयातील अनेक नदयांना पूर आला असून आज पहाटे पासून परभणी जिल्हयातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.अनेक गावांत आणि शेतात पाणी गेल्याने परिस्थिती गंभीर आहे.
काल परभणी आणि जालना जिल्हयात जोरदार पाउस झाला त्यामुळे दुधना व कसुरा या दोन नदयांना पुर आला परभणीसह जालना जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला आहे. या नदयांचे पाणी कुंभारी, कार्ला, डिग्रस या तीन गावांतील शेतात घुसल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले. तर पाथरी, वालूर, शिंदेटाकळी, आष्टी या गावांचा संपर्क तुटला असून नदयांची पाणीपातळी वाढत आहे.कसुरा नदीचे रस्त्यावर व सर्वदुरपर्यंत पसरल्याने सेलू -पाथरी रस्ता बंद पडला आहे या रस्त्यावरिल वाहतूक आज दिवसभर ठप्प आहे. तसेच सेलूकडून इतर गावांना जोडणारे रस्तेहि पाणी रस्त्यावर आल्याने बंद झाले आहेत.दुधना व कसुरा नदीच्या पुराचा तडाखा सेलु तालुक्याला जास्त बसला असून सेलु तालुक्यातील गावांना पाण्याने वेढले आहे.